Uncategorized

कांद्याने शेतकर्‍यांना रडवले ! आज कांद्याच्या भावात मोठी घसरण…

कांद्याने शेतकर्‍यांना रडवले ! आज कांद्याच्या भावात मोठी घसरण...

नाशिक : जिल्ह्यात काही दिवसांपापून कांद्याच्या दरात सारखी घसरण होताना दिसत आहे. कांदा मागणीत देशांतर्गत घट होत असल्याने विविध राज्यांमध्ये स्थानिक कांदा उपलब्ध होताना दिसत आहे.त्यामुळे आताच झालेल्या होळीनंतर जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये लाल व नवीन उन्हाळी कांद्यांच्या दरात दीडशे ते दोनशे रुपयांची घसरण झाली आहे.

तसेच उमराणे बाजार समितीत लाल कांद्याचे सर्वोच्च दर ९५० रुपये तर उन्हाळी कांद्याचे दर १०५० रुपयांपर्यंत खाली आल्यामुळे परिणामी कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.Nashik: Falling onion prices in the district

तसेच आत्ताच झालेल्या होळी सणाच्या आधी लाल व उन्हाळी कांद्यांचे दर एक हजार ते तेराशे रुपयांपर्यंत होते. परंतू सद्यस्थिती पाहता राजस्थान,अलवर, बंगाल या राज्यांमध्ये स्थानिक कांदा बाजारात उपलब्ध झाला आहे. तसेच देशांतर्गत कांद्याची मागणीतही घट झाली असल्याने बाजारभावात घसरण झाल्याची दिसत आहे. त्यामुळे अनेक कांदा खरेदी व्यापा-यांकडून सांगण्यात येत आहे की, ब-याच व्यापारी बांधवांकडे कांदा गोणी भरण्यासाठी कोकणी मजूर वर्ग आहे. परंतू त्यांचा मुख्य सण होळी असल्याने ते गावी गेल्यामुळे मजूर टंचाईनेही बाजारभावावर काही अंशी परिणाम झाला आहे.

दरम्यान, या होळी सणाच्या आधी लाल कांद्याचे दर ११०० रुपये तर नवीन उन्हाळी कांद्याचे दर १२०० रुपयांपर्यंत होते. परंतु आता ते दर तब्बल दीडशे ते दोनशे रुपयांनी घसरल्याने लाल कांद्याला कमीत कमी ४०१ रुपये,जास्तीत जास्त ९५० रुपये तर उन्हाळी कांद्याला कमीत कमी ५०१ रुपये, तर जास्तीत जास्त १०५० रुपये असा बाजारभाव मिळाला आहे.

त्यामुळे बाजारभाव कमी झालेच पण कांदा पिकापासून मिळणारा नफा दूरच आहे, परंतू कांदा उत्पादनासाठी केलेला खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे.

गेल्या वीस दिवसांत सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तालुक्यातील नांदूरशिंगोटे व दोडी बुद्रुक उपबाजारातही तब्बल १ लाख ८० हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली होती. परंतु गेल्या महिन्याच्या तुलनेत कांदा दरात सरासरी एक हजार ते बाराशे रुपये प्रतिक्विंटल घसरण झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात चक्क पाणी आले आहे.

तसेच या पंधरवड्यात कांद्याला सरासरी प्रति क्विंटल एक हजार रुपये भाव मिळाला असून, येणा-या काळात उन्हाळी कांद्याची आवक होणार असल्याने त्याचा थेट परिणाम हा लाल कांद्याच्या बाजारभावावर झाला आहे.

कृषि उत्पन्न बाजार समिती, चांदवड
ता. चांदवड जि.नाशिक
—————————————-
गुरुवार दि.24/03/2022 चे बाजारभाव

—————————————-
शेतमालाचे| किमान| कमाल| सरा
नाव | भाव | भाव | भाव


———————————————–
मुख्य बाजार आवार,चांदवड👇
🧅 🧅 🧅 🧅 🧅 🧅 🧅 🧅
लाल कांदा = 200-1071-680
लाल कांदा (गोल्टा)=100-553-350
उन्हाळ कांदा =600-855-700


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button