जिओच्या या ग्राहकांना मिळणार 1 वर्षभर मोफत रिचार्च…- Jio
आता पुन्हा नवीन वर्षाच्या सुरुवातीला Reliance Jio ने आपल्या काही ग्राहकांना एक वर्षासाठी फ्री रिचार्ज तर काही युजरला फ्री डेटा देत आहे.
reliance Jio Recharge Pack : Reliance Jio देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम ऑपरेटरपैकी एक आहे. मुकेश अंबानी यांच्या मालकीची रिलायन्स जिओ २०१६ मध्ये लॉन्च झाली होती.
जिओने आक्रमक रिचार्ज योजना आणि मोफत डेटा ऑफरसह दूरसंचार उद्योगात खळबळ उडवून दिली होती. मात्र आता पुन्हा नवीन वर्षाच्या सुरुवातीला Reliance Jio ने आपल्या काही ग्राहकांना एक वर्षासाठी फ्री रिचार्ज तर काही युजरला फ्री डेटा देत आहे.
तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल हे कसं शक्य आहे. यासाठी आपल्याला My Jio apps मध्ये जावे लागेल.तेथे तुम्हाला pay and win आॅप्शन दिसेल तिथे क्लिक करुन या आॅप्शनमध्ये तुम्हाला one year Recharge offer किंवा डेटा आॅफर दिसेल. तिथे किल्क करुन याचा लाभ घेवू शकता.
Jio ग्राहकांसाठी, कंपनीकडे 119 रुपयांपासून सुरू होणारे रिचार्ज प्लॅन आहेत. त्यांची किंमत 4,199 रुपयांपासून सुरू होते. आम्ही तुम्हाला Jio च्या त्या प्रीपेड प्लान्सबद्दल सांगत आहोत ज्यांची वैधता 1 वर्ष आहे.
३६५ दिवसांच्या वैधतेसह जिओ प्रीपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना अमर्यादित व्हॉईस कॉल, एसएमएस आणि डेटा यासारख्या सुविधा मिळतात. यासोबतच दर महिन्याला रिचार्जचेही टेन्शन नाही. त्यांच्याबद्दल जाणून घ्या…
1 वर्षाच्या वैधतेसह जिओ रिचार्ज प्लॅन
1559 रुपयांचा जिओ रिचार्ज प्लॅन
रिलायन्स जिओच्या 1,559 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनची वैधता 336 दिवसांची आहे. जिओचा हा प्रीपेड प्लान अमर्यादित व्हॉइस कॉलसह येतो. म्हणजेच ग्राहक देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित लोकल, एसटीडी आणि व्हॉइस कॉल करू शकतात. या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण 24 जीबी ऑफर करण्यात आली आहे. प्लॅनमध्ये 3600 एसएमएस मोफत उपलब्ध आहेत. यासोबतच JioCinema, JioTV, JioSecurity आणि JioCloud सारख्या Jio अॅप्सचे सबस्क्रिप्शनही या प्लॅनमध्ये मोफत दिले जाते.
2024 रुपयांचा जिओ रिचार्ज प्लॅन
2023 च्या नवीन Jio प्रीपेड रिचार्ज प्लॅनची वैधता 252 दिवसांची आहे. जिओच्या या प्लॅनमध्ये दररोज २.५ जीबी डेटा मिळतो, म्हणजेच या प्लानमध्ये ग्राहक एकूण ६३० जीबी डेटा वापरू शकतात. याशिवाय या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉल्स आणि एकूण १०० एसएमएस दररोज दिले जातात. या प्लॅनमध्ये ग्राहक JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud वर मोफत प्रवेश देखील घेऊ शकतात.
2545 रुपयांचा जिओ रिचार्ज प्लॅन
Jio च्या नवीनतम रिचार्ज प्लॅनची किंमत 2545 रुपये आहे. हा प्लान 336 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये दररोज १.५ जीबी डेटा मिळतो. म्हणजेच या रिचार्जमध्ये ग्राहक एकूण 504 जीबी डेटा वापरू शकतात. या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलची सुविधा आहे. या रिचार्ज पॅकमध्ये दररोज १०० एसएमएस उपलब्ध आहेत. या प्रीपेड प्लॅनमध्ये Jio TV, Jio Cinema, Jio Security आणि Jio Cloud च्या सुविधाही मोफत उपलब्ध आहेत.
2879 रुपयांचा जिओ रिचार्ज प्लॅन
रिलायन्स जिओच्या 2879 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची किंमत 2,879 रुपये आहे. प्रीपेड प्लॅन दररोज 2 GB डेटा ऑफर करतो आणि 365 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये संपूर्ण कालावधीसाठी एकूण 730GB डेटा देण्यात आला आहे. याशिवाय या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलची सुविधाही उपलब्ध आहे. या रिचार्जमध्ये दररोज १०० एसएमएस मिळतात.
2,999 रुपयांचा जिओ रिचार्ज प्लॅन
2,999 रुपयांच्या Jio प्रीपेड पॅकची वैधता 365 दिवसांची आहे. म्हणजे जर तुम्ही एकदा रिचार्ज केले तर तुम्हाला 1 वर्षासाठी कोणतेही टेन्शन राहणार नाही. या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलची सुविधा आहे. या रिचार्ज पॅकमध्ये दररोज २.५ जीबी डेटा येतो. म्हणजेच या प्लॅनमध्ये एकूण 912.5 GB डेटा देण्यात आला आहे. याशिवाय प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस मिळतात. या पॅकमध्ये JioTV, JioSecurity, JioCinema आणि JioCloud सारख्या Jio अॅप्सचे सबस्क्रिप्शन मोफत दिले जाते.