
नासिकरोड : आज नाशिक शहरात धक्कादायक भीषण अपघात घडला. अंत्ययात्रा वरून परतत असताना नाशिक रोड येथील दत्त मंदिर जवळ पती-पत्नीला आपला जीव गमवावा लागला आहे.
पती-पत्नी परतत असताना डंपरने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याने एक खळबळ उडाली.
याबाबत वृत्त असे की चेहडी शिव साई विहार सोसायटीत राहणाऱ्या विठ्ठल दादा घुगे वय (51)व त्यांची पत्नी सुनीता विठ्ठल घुगे वय( 47 )हे दोघे आज सकाळी आपल्या नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी मखमलाबाद या ठिकाणी गेले होते.
अंत्यविधीचा कार्यक्रम आटपून ते दोघे आपल्या मोटरसायकल क्रमांक MH 15 EV186 7वरून घरी परतत असताना दत्तमंदिर सिग्नल सोडताच हॉटेल सद्गुरू समोर अज्ञात डंपरने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की त्यात त्या दोघा पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला.
त्यावेळी दत्त मंदिर सिग्नलवर एकही वाहतूक पोलीस उपस्थित नसल्याचे स्थानिक व्यवसायिकांनी सांगितले .
घटनेची माहिती समजताच सहाय्यक पोलिस आयुक्त डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ, उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंकज भालेराव आदींसह वाहतूक पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. डंपर चालक पळून गेल्याने त्याच्या शोधार्थ एक पथक पुण्याच्या दिशेने रवाना करण्यात आले.