नाशिक जिल्हा हादरला ! पोटच्या मुलाने केला आई-बापाचा खून…
नाशिक जिल्हा हादरला ! पोटच्या मुलाने केला आई-बापाचा खून...

नाशिक : – नाशिक जिल्ह्यात पोटच्या मुलाने आपल्या जन्मदात्या आई वडिलांचा खून केला आहे. आपल्या जन्मदात्या आई बापालाच आपल्या मुलाने जीवे मारल्याने सदर घटनांमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील खडक माळेगाव येथे मुलानेच आपल्या आई वडिलांचा खून केल्याची घटना घडली आहे. एका माथेफिरु युवकाने अगोदर आई वडिलांना मारहाण करीत त्यांची हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.
युवकाचे नाव दत्तात्रय रामदास सुडके (३५) आहे. कौटुंबिक भांडणातून त्याने हे कृत्य केले आहे. या घटनेत वडिल रामदास आणाजी सुडके (६५) व आई सरुबाई रामदास सुडके (६०) यांचा मृत्यू झाला आहे.
या घटनेबाबत समजलेली माहिती अशी की, मुलाने आई वडिलांवर मोठ्या काठीने मारहाण केली. त्यातूनच त्यांचा मृत्यू झाला. ही घटना समजताच लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी कर्मचारी प्रदीप आजगे, कैलास महाजन ,योगेश शिंदे यांचेसह घटना स्थळी दाखल झाले आहे.
पोलिसांनी या गुन्ह्यात वापरलेली काठी जप्त केली आहे. तसेच. दत्तात्रय रामदास सूडके यास ताब्यात घेतले आहे. सर्व व्यवहार आईचे हातात होते ते आपल्या हाती यावेत म्हणून तो वाद घलीत होता अशी माहिती समोर आली आहे. घटनास्थळी निफाडचे पोलीस उप अधीक्षक सोमनाथ तांबे दाखल झाले आहेत.