Uncategorized

नाशिक – असं काय घडलं की नंदी दुध पितोय ? पहा तुमच्या डोळ्यांनी…

नाशिक - असं काय घडलं की नंदी दुध पितोय ? पहा तुमच्या डोळ्यांनी...

शरद शेळके / वेगवान न्यूज

नाशिक , सिन्नर : नंदी पाणी पितो आहे अशा प्रकारचा चमत्कार घडत असल्याची अफवा पसरल्याने राज्यातील अनेक भागात भाविकांनी महादेव मंदिरात तोबा गर्दी केली आहे. आज दुपारपासून नंदी पाणी पीत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

यामुळेच अनेक ठिकाणी नंदी खरंच पाणी व दूध पितो का ? हे बघण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.एकाच दिवशी राज्यभर महादेव मंदिरातील नंदीची मूर्ती पाणी व दूध पित असल्याची चर्चा सोशल मीडिया माध्यमातून पसरली आणि मग काय सर्वत्र मंदिरात गर्दी झाली.

नुकतेच महाशिवरात्री पार पडली असून शनिवारी हा प्रकार समोर आला. महादेव मंदिरातील नंदीची मूर्ती पाणी पीत असल्याची नातेवाईकांनी राज्यभरात एकमेकांना फोन करून माहिती दिली आणि आपल्या परिसरातील मंदिरात हा प्रयोग करून पाहण्याचे सांगितले.

सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथे नंदी पाणी पीत असल्याचा व्हिडिओ काही जणांच्या व्हाट्सअप वर आला आणि काही वेळातच मुसळेश्वराच्या मंदिरात नागरिकांनी नंदी खरच पाणी पितो का हे बघण्यासाठी गर्दी केली आहे.

प्रा.परेश शाह,राज्य कार्यवाह,महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती.यांच्या नावाने अफवांना बळी न पडण्याचा मेसेज प्रसारमाध्यमांवर फिरत आहे.याबाबत वेगवान समूह कुठलीही पुष्ठी करत नाही.

आज सर्व भारतभर नंदी दूध वा पाणी पित असल्याच्या अफवा पसरल्या आहेत आणि २१सप्टेंबर, १९९५ च्या घटनेची पुनरावृत्ती झाली.सर्वप्रथम असा कोणताही चमत्कार घडत नाही हे लक्षात घ्यावे व अशा घटनेमागील कार्यकारण भाव समजून घ्यावा. या चमत्कारामागील विज्ञान समजून घ्यायला हवे.विज्ञानामध्ये याला पृष्ठीय ताण किंवा सरफेस टेंशन म्हणतात.

या ताणामुळे दगडाच्या मूर्तीत पाणी खेचले जाते. मूर्ती आतून पोकळ असल्यास पाणी तोंडाच्या पोकळीतून पोटात जाते व मूर्ती भरीम असल्यास खाली जमिनीवर झिरपते.थोडी चिकित्सक वृत्ती आणि शोधक बुध्दी वापरली तर हे सहज लक्षात येते. त्यामुळे अशा चमत्कार आणि अफवांना कोणीही बळी पडू नये व विनाकारण गर्दी करु नये. असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या वतीने आम्ही समाजाला करु इच्छितो.

प्रा.परेश शाह,राज्य कार्यवाह,महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button