MaharashtraVahan Bazar

नाशिक शहरात बसने प्रवास करताय… तर आजपासून मोजावे लागणार जास्तीचे भाडे…

नाशिक शहरात बसने प्रवास करताय... तर आजपासून मोजावे लागणार जास्तीचे भाडे...

नाशिक – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून नाशिक शहरात बस बंद करण्यात आल्यानंतर नाशिक शहर महापालिकेने बस सेवा सुरू केली आहे. या बस सेवेला उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. मात्र आता नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. अर्थातच सिटीलिंकच्या वतीने शहर बस सेवेत भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. व सदर नवीन भाडेवाढ हि दिनांक १५ फेब्रुवारी २०२३ च्या मध्यरात्रीपासून पासून करण्यात आली आहे. तशी माहिती नाशिक महापालिकेने दिली आहे.

वाढणारे इंधन दर लक्षात घेता, परिणामी वाढणारा आर्थिक तोटा लक्षात घेता हि भाडेवाढ करण्यात आली आहे. आवश्यक सर्व सक्षम प्राधिकरणाच्या मान्यतेनंतर ही भाडेवाढ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार १ जानेवारी २०२३ पासून लागू करण्यात येणारी भाडेवाढ उशिराने अखेर १५ फेब्रुवारी २०२३ पासून लागू करण्यात येणार आहे. याची प्रवाश्यांनी नोंद घ्यावी, असे महापालिकेने सांगितले आहे.

Whatsapp Group Join
Telegram channel Join

यामध्ये वाढलेले इंधन दर बघता तसेच प्रवासी हिताचा विचार करता कोणतीही अतिरिक्त भाडेवाढ न करता केवळ नियमांनुसार भाडेवाढ करण्यात आलेली आहे. सुखकर, अद्ययावत, सुरक्षित प्रवास नाशिककरांना उपलब्ध करून देण्यासाठी सिटीलिंक नेहमीच प्रयत्नशील आहे.

त्यासाठी प्रवासी नागरिकांनी सिटीलिंकच्या भाडेवाढीच्या निर्णयाला देखील सहकार्य करावे ही विनंती महापालिकेने केली आहे. याबाबतची माहिती महापालिकेने ट्विटरद्वारे दिली आहे.

Whatsapp Group Join
Telegram channel Join

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button