1 लाखाचे झाले 87 लाख, तुम्ही सोलर एनर्जीच्या महाकाय कंपनीत गुंतवणूक केली आहे का?
1 लाखाचे झाले 87 लाख, तुम्ही सोलर एनर्जीच्या महाकाय कंपनीत गुंतवणूक केली आहे का?
नवी दिल्ली : शेअर बाजारातील गुंतवणुकीतून मल्टीबॅगर ( Multibagger ) मिळवण्यासाठी, आपण अशा कंपन्यांची ओळख करणे आवश्यक आहे ज्यांच्यामध्ये व्यवसायात चांगली वाढ आणि आगामी काळात नफा कमावण्याची क्षमता आहे. जर तुम्ही अशा कंपन्या योग्य वेळी ओळखल्या आणि त्यामध्ये गुंतवणूक केली तर ते तुम्हाला कमी कालावधीत बंपर परतावा मिळवण्यास मदत करू शकते.
Waaree : सुमारे 2369 कोटी रुपयांचे मार्केट कॅप असलेल्या वारी रिन्युएबल्सने ( Waaree Renewable ) गेल्या 5 वर्षांत 261 टक्के नफा कमावला आहे.
सुमारे 2369 कोटी रुपयांचे मार्केट कॅप असलेल्या Waaree Renewable ने गेल्या 5 वर्षात 261 टक्के नफा कमावला आहे. Waaree Renewable कंपनीने नुकत्याच जाहीर झालेल्या तिमाही आणि वार्षिक निकालांमध्ये व्यवसाय वाढवण्याबाबत माहिती दिली आहे.
गेल्या 3 वर्षात वारी रिन्युएबल्सच्या शेअर्सनी 13000% परतावा दिला आहे तर 1 वर्षात 275% परतावा देऊन गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे.
सौरऊर्जा व्यवसायातील सोलर एनर्जी ( solar energy ) दिग्गज वारी रिन्युएबल्स टेक्नॉलॉजीच्या शेअर्समध्ये Share market गुंतवणूकदारांचा रस वाढला आहे, ज्यामुळे अलीकडेच त्याच्या शेअर्सला खूप गती मिळाली आहे. 1 जानेवारी 2021 रोजी वारी रिन्युएबल्सचे शेअर्स 13.68 रुपयांच्या पातळीवर होते, ज्यांनी आता 1153 रुपयांची पातळी ओलांडली आहे.
गेल्या 1 वर्षात गुंतवणूकदारांना 275 टक्के बंपर परतावा देणाऱ्या वारी रिन्यूएबल्सने अल्प आणि दीर्घ मुदतीत गुंतवणूकदारांना बंपर परतावा दिला आहे. वारीने 122 मेगा वॅट डीसी सौर ऊर्जा प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केल्याची माहिती शेअर बाजाराला दिली आहे. ही ऑर्डर 210 MW DC क्षमतेसाठी होती.
वारी ही सौरऊर्जा व्यवसायातील एक अग्रगण्य कंपनी आहे जी अक्षय ऊर्जा स्त्रोतांपासून वीज निर्मिती करते. कंपनी या बाबतीत सल्लागार सेवा देखील प्रदान करते. वारी रिन्युएबल्सचे शेअर्स 2021 पासून गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवू लागले आहेत. 8 जानेवारी 2021 रोजी वारीचे शेअर्स 13.77 रुपयांच्या पातळीवर होते, जे आता 1153 रुपयांच्या पुढे गेले आहेत.