या तारखेला दहावी, बारावीचा निकाल जाहीर होणार ! येथे करा निकाल चेक !
या तारखेला दहावी, बारावीचा निकाल जाहीर होणार ! येथे करा निकाल चेक !

HSC SSC Result 2022 :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार “दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या पेपर तपासणीचे काम जवळपास पूर्ण झालं आहे. आता दहावी आणि बारावी परीक्षेचे निकाल तयार करण्याचं काम सुरु आहे.
त्यामुळे राज्यातील दहावी-बारावीच्या मुलांसाठी आनंदाची बातमी आहे.पुढील महिन्यातील 10 जूनपर्यंत बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर करणार असून दहावीचा निकाल 20 जूनपर्यंत जाहीर केला जाईल,” अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे.
शिक्षकांच्या पेपर तपासणी बहिष्कारामुळे निकाल उशिरा लागण्याची चिंता विद्यार्थी आणि पालकांना सतावत होती. परंतु जून महिन्यातच दोन्ही परीक्षांचे निकाल लागणार असल्याचं बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे.
MSBSHSE Maharashtra SSC and HSC Result 2022 Live Updates :
MSBSHSE महाराष्ट्र HSC निकाल 2022 लाइव्ह अपडेट्स : महाराष्ट्र बोर्डाने (MSBSHSE) HSC म्हणजेच 12वीचा निकाल जाहीर करणार आहे.
खालील लिंक वरती दहावी बारावीचा रिझल्ट जाहीर होणार आहे.
maharesult.nic.in,
msbshse.co.in,
mahahsscboard.in
mahahsscboard.maharashtra.gov.in
वरील वेबसाईट वर निकाल पाहू शकतात.
शेवटच्या पेपरच्या 60 दिवसांनंतर निकाल जाहीर केला जातो ही प्रमाणित प्रक्रिया आहे. यावेळी बारावीचा पेपर 15 दिवस उशिरा सुरु झाला.
त्यामुळे, आम्ही 10 जूनपर्यंत निकाल जाहीर करु, असं बोर्डाने म्हटलं. त्यानंतर दहा दिवसांनी दहावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.