Monsoon Update : मान्सूनचा पाऊस कधी कोसळणार ! मान्सून संदर्भात महत्त्वाची बातमी
Monsoon Update : मान्सूनचा पाऊस कधी कोसळणार ! मान्सून संदर्भात महत्त्वाची बातमी

Monsoon Rain Updates : राष्ट्रीय राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील राज्ये मान्सूनच्या पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हवामान विभागाच्या (IMD) मते, नैऋत्य मान्सून उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागराच्या काही भागात, ईशान्य आणि पूर्व मध्य बंगालच्या उपसागराच्या काही भागात पुढे सरकला आहे आणि मिझोराम, मणिपूर आणि नागालँडच्या बहुतांश भागात पोहोचला आहे.
आता लवकरच मुंबईत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानुसार मुंबईत मान्सूनच्या आगमनाची तारीख १० जून मानली जाते. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात मान्सून दाखल होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, पुढील दोन दिवस विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
मुंबईत काही ठिकाणी हलका पाऊस आणि रिमझिम पाऊस सुरू आहे. ज्याला मान्सूनपूर्व पाऊस म्हटले जात आहे. हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, यंदा पाऊस सामान्य असेल. नैऋत्य मान्सून निर्धारित वेळेच्या ४ दिवस आधीच पश्चिम बंगालमध्ये पोहोचला आहे.
IMD ने पश्चिम बंगालच्या किनारी भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्यानुसार, ईशान्येकडील राज्यांमध्ये मान्सूनच्या आगमनामुळे आसाम आणि मेघालयमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
IMD नुसार, बंगालच्या उपसागरातून ईशान्य भारताकडे वाहणाऱ्या जोरदार नैऋत्य वाऱ्यांमुळे, ईशान्येकडील राज्ये आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगालमध्ये पुढील 3-4 दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
त्याचवेळी वायव्य भारतात कमाल तापमानात वाढ होत आहे. राजस्थान, दक्षिण पंजाब आणि दक्षिण हरियाणामध्ये पुढील दोन दिवस उष्णतेपासून दिलासा मिळणार नाही, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
या भागात पावसाची शक्यता
हवामान अंदाज एजन्सी स्कायमेटच्या मते, दक्षिण द्वीपकल्पात मान्सूनची स्थिती कमकुवत राहण्याची आणि देशाच्या ईशान्य भागात सामान्य राहण्याची शक्यता आहे.
आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, अंदमान आणि निकोबार बेटांवर हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचवेळी ओडिशा, किनारी आंध्र प्रदेश, मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण आणि गोव्यात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.
भारतीय हवामान विभाग (IMD) ने आपल्या शेवटच्या हवामान अपडेटमध्ये 7 जूनपासून दक्षिण द्वीपकल्पीय भारतात पावसाचे प्रमाण वाढेल असे सांगितले होते. IMD नुसार, कर्नाटक, केरळ आणि लक्षद्वीपमध्ये गडगडाट-विजांच्या कडकडाटासह बऱ्यापैकी व्यापक हलका-मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि पुढील पाच दिवसांत पाऊस आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी येथे विखुरलेला दिसून येईल.
पुढील पाच दिवसांत दक्षिणेतील कर्नाटकात 6 आणि 7 जून रोजी तामिळनाडू 7, 8 आणि 9 जून रोजी केरळ आणि 8 जून रोजी उत्तर कर्नाटकात मुसळधार पावसाची शक्यता आहे. आयएमडीने म्हटले आहे की पुढील पाच दिवसांत ईशान्य भारत, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये पावसाचा जोर कायम राहील.