Uncategorized

अजून मान्सून किती दिवस कहर करणार… नुकसान करणारा हा पाऊस कधी परतणार पाहा ?

आता तरी जा बाबा ! नंतरचा नुकसान करणारा हा पाऊस कधी परतणार पाहा ?

मुंबई : यंदाच्या पावसाने अनेक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. ज्या परिसरात अतिवृष्टीचा पाऊस असलेल्या ठिकाणची शेतकरी पुरती वैतागले आहे.तसेच अनेक राज्यांतून पावसाने काढता पाय घेतला आहे. मात्र महाराष्ट्रातून मान्सूनच्या (Monsoon in Maharashtra) परतीच्या प्रवासाला उशिर होणार आहे.

यंदा राज्यातील पावसाचा मुक्काम वाढला असून 20 ऑक्टोबरनंतरच पाऊस महाराष्ट्रातून (Rain in Maharashtra) माघारी फिरण्याची शक्यता आहे. अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने (Indian Meteorological Department) हा अंदाज वर्तवला आहे.

तसेच शहरातील व दमट भागातील लोकांना  अधूनमधून पावसाचा गारवादेखील एन्जॉय करू शकणार आहेत.

शेतकऱ्याच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

यंदा पावसाळ्याचा महिना संपला तरी पाऊस काढता पाय घेत नसल्याने व पावसाने राज्यभर माजवलेल्या हाहाःकारामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी वाढ झाली.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेल्या पीक हेरावून गेल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठा भर पडलाय.

कापणीला आलेल्या पिकांचं मोठं झालं आहे. पिकं वाहून गेली तर पिककर्ज कसं फेडायचं हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय.

यंदा आतापर्यंत पावसाची समाधानकारक हजेरी लागली आहे. त्यामुळे बहुतांश तलावांमध्ये पुरेसा पाणीसाठा आहे. त्यातच आता 20 ऑक्टोबरपर्यंत पावसाचा महाराष्ट्रातील मुक्काम वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे अनेक भागांतील पाणीटंचाईचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे.

काल नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात वादळी वाऱ्यासह तुफान अशी गारपीट झाल्याने कांदा पिकासह टोमॅटो पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर संकट निर्माण झाले आहे. आजदेखील मुंबईच्या उपनगरांत अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली.

बोरिवली, भांडुप परिसरात पावसाने जवळपास अर्ध्या तासाहून अधिक वेळ बरसात सुरु ठेवली. त्यामुळे रस्ते निसरडे झाल्यानंतर त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला. जागोजागी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र उपनगरात दिसले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button