फक्त 20000 रुपये भरून WagonR CNG घरी घेवून या, काय आहे फीचर्स…
फक्त 20000 रुपये भरून WagonR CNG घरी घेवून या, काय आहे फीचर्स...

मुंबई : 20000 रुपये पाहून तुम्ही लोकप्रिय WagonR CNG ला फॅमिली कार म्हणून घरी नेऊ शकता. भारतातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकीच्या सीएनजी वाहनांची मागणी सध्या प्रचंड वाढली आहे. WagerR वर 2-3 महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी आहे. वॅगनआर अजूनही सर्वाधिक विक्री होणाऱ्या सीएनजी वाहनांपैकी एक आहे. त्याची कमी किंमत, उत्तम मायलेज आणि मेंटेनन्स स्वस्त असल्यामुळे लोकांना ते खरेदी करायला आवडते.
Maruti Suzuki LXI WagonR CNG मॉडेलची किंमत 6.34 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. तुम्ही 20000 हजार रुपये डाउन पेमेंट भरून खरेदी केल्यास, कार देखो EMI कॅल्क्युलेटरनुसार, तुमचा EMI 7 वर्षांसाठी 8 टक्के व्याजासह 10,732 रुपये होईल. तुम्हाला ७ वर्षांत २,१२,९५९ रुपये व्याज द्यावे लागेल.
Maruti Suzuki LXI WagonR CNG वर उपलब्ध असलेले कर्ज, डाउन पेमेंट आणि व्याजदर हे देखील तुमच्या बँकिंग आणि CIBIL स्कोअरवर अवलंबून आहेत. तुमच्या बँकिंग किंवा CIBIL स्कोरचा अहवाल नकारात्मक असल्यास, बँक त्यानुसार या तिन्हींमध्ये बदल करू शकते.
इंजिन
नवीन मारुती वॅगन आर फेसलिफ्टमध्ये 1.0-लिटर के-सिरीज ड्युअल जेट आणि ड्युअल VVT इंजिन वापरण्यात आले आहेत. यात 1.2 लीटर इंजिनचा पर्याय देखील आहे आणि आधी सांगितल्याप्रमाणे, कंपनीने ते फॅक्टरी फिट सीएनजी किटसह बाजारात आणले आहे. वॅगन आर सीएनजीमध्ये १.० लिटर इंजिन वापरण्यात आले आहे.
मायलेज
कंपनीच्या मते, वॅगन आर फेसलिफ्टचे नवीन सीएनजी प्रकार ३४.०५ किमी/किलो मायलेज देते.
वैशिष्ट्ये
यात स्मार्टफोन नेव्हिगेशनसह 7-इंचाची स्मार्टप्ले स्टुडिओ इन्फोटेनमेंट सिस्टम दिली जात आहे, जी 4 स्पीकरसह येते. HEARTECT प्लॅटफॉर्म असलेली नवीन WagonR तिच्या रायडर्ससाठी उत्तम सुरक्षा उपाय प्रदान करते.
यात ड्युअल एअरबॅग्ज, अँटिलॉक ब्रेकिंग सिस्टीम, इलेक्ट्रॉनिक ब्रेक-फोर्स डिस्ट्रिब्युशन, फ्रंट सीट बेल्ट रिमाइंडर, हाय-स्पीड अलर्ट सिस्टम आणि मागील पार्किंग सेन्सर यासह सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत.