मारुतीने काढली 34km मायलेज असलेली 5 स्टार रेटिंगवाली कार,जाणून घ्या फिचर्ससह किंमत
मारुतीने काढली 34km मायलेज असलेली 5 स्टार रेटिंगवाली कार,जाणून घ्या फिचर्ससह किंमत
नवी दिल्ली : Maruti Suzuki Dzire bookings – देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकीने अलीकडेच आपली नवीन कॉम्पॅक्ट सेडान कार डिझायर लॉन्च केली आहे. कारची किंमत 6.79 लाख रुपयांपासून सुरू होते. नवीन Dezire मध्ये 1.2 लिटर पेट्रोल इंजिन आहे आणि त्यात CNG पर्याय देखील उपलब्ध आहे. नवीन डिझायरला दररोज 1000 बुकिंग मिळत आहेत.
या कारच्या ZXi आणि ZXi+ प्रकारांना सर्वाधिक मागणी आहे. हे दोघेही टॉप मॉडेल आहेत. 50% बुकिंग या दोन प्रकारांसाठी आहे. नवीन डिझायरचे बुकिंग 4 नोव्हेंबरपासून सुरू झाले असून आतापर्यंत 30 हजारांहून अधिक बुकिंग मिळाले आहे. कंपनीने आतापर्यंत 5000 कार डिलिव्हरी केल्या आहेत. चला जाणून घेऊया या कारच्या इंजिनपासून ते इंजिनपर्यंतच्या फीचर्सविषयी…
किंमत आणि रूपे
Dzire LXi: रु. 6.79 लाख
Dzire VXi: रु 7.79 लाख
Dzire ZXi: रु 8.89 लाख
Dzire ZXi+ रु. 9.96 लाख
Dzire AGS VXi: रु 8.24 लाख
Dzire AGS VXi: रु 934 लाख
Dzire AGS ZXi+: रु 10.14 लाख
Dzire CNG VXi: रु 8.74 लाख
Dzire CNG ZXi: रु. 9.84 लाख
इंजिन आणि मायलेज
नवीन मारुती डिझायरमध्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिन आहे जे 82 पीएस पॉवर आणि 112 एनएम टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल आणि 5 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह येते. यामध्ये सीएनजीचा पर्यायही ग्राहकांसाठी ठेवण्यात आला आहे.
डिझायर 1.2-लिटर पेट्रोल, 5 MT: 24.79 kmpl
डिझायर 1.2-लिटर पेट्रोल, 5 AMT: 25.71 kmpl
डिझायर 1.2-लिटर पेट्रोल+सीएनजी, 5 एमटी: 33.73 किमी/किलो
सेफ्टी 5 स्टार रेटिंग मिळाले
नवी Dezire ही मारुतीची पहिली कार आहे जिला ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे. नवीन डिझायरची वेगवेगळ्या कोनातून चाचणी घेण्यात आली. सुरक्षेच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, या कारमध्ये 6 एअरबॅग, EBD सह अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, 3 पॉइंट सीट बेल्ट, सुझुकी हार्टेक्ट बॉडी, ESP, हिल होल्ड असिस्ट आणि रिव्हर्स पार्किंग सेन्सर यांसारखी फीचर्स आहेत.
डिझाइन आणि स्पेस
आता नवीन डिझायरमध्ये नवीन डिझाईन पाहता येणार आहे. ही कार समोर, बाजू आणि मागील बाजूने पूर्णपणे बदलण्यात आली आहे. त्याचे इंटीरियर देखील मोठ्या प्रमाणात बदलण्यात आले आहे. गाडीत चांगली स्पेस आहे. यात ५ जणांच्या बसण्याची जागा आहे. डिझायर ( Dzire ) 4 डिसेंबर रोजी लॉन्च होणाऱ्या होंडा अमेझशी थेट स्पर्धा करेल.