Maharashtra

Rain Alert : पुढील 4 दिवस राज्यातील `या` जिल्ह्यांना गारपिटीसह अवकाळी पाऊस झोडपणार

Rain Alert : पुढील 4 दिवस राज्यातील `या` जिल्ह्यांना गारपिटीसह अवकाळी पाऊस झोडपणार

Maharashtra Unseasonal Rain Update : यंदा शेतीमालाला भाव नाही. शेतकऱ्यांनी पिकवलेला मालाला भाव नसल्याने अगोदर शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.त्यातच काही दिवसांपूर्वी राज्याच्या काही भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे (Rain Update) बळीराजाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.

या संकटातून शेतकरी सावरतोय तोच आता आता पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. पुढचे 4 दिवस राज्याच्या काही भागात पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. यामुळे बळीराजा आणखी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे

(IMD Maharashtra Unseasonal Rain Update Rain with hail likely over Vidarbha Marathwada and North Maharashtra)

राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 13 ते 16 मार्चदरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला गेला आहे. तर विदर्भात 14 ते 16 मार्च दरम्यान अवकाळी पावसाची (Unseasonal Rain) शक्यता असल्याने आता शेतकऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

राज्यात प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा मोठ्या प्रमाणात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

कोण कोणत्या जिल्ह्यात होणार –

संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, लातूर तसेच नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज…

त्यामुळे कांदा, गहू, हरभरा, सोयाबीन, मका, तूर, केळी या पिकांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता हातातोंडाशी आलेला घास पाऊस हिसकावून घेणार की काय? असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय.

दरम्यान, हवामान बदलामुळे ढगांची गर्दी होऊन पावसासाठी पोषक वातावरण तयार होतंय. होळीच्या काळात पावसाच्या हलक्या ते जोरदार सरी बरसल्या होत्या.

अवकाळी पाऊस उतरल्यानंतर उकाडा मात्र अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे शहरी भागात उन्हाचे चटके आणखी तीव्र होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button