महाराष्ट्रात भिंत व फरशीतून निघाले कोट्यवधी रुपये, जीएसटी पथकाने मारला छापा, पहा व्हिडिओ…
महाराष्ट्रात भिंत व फरशीतून निघाले कोट्यवधी रुपये, जीएसटी पथकाचा कार्यालयावर छापा

मुंबई : महाराष्ट्रात जीएसटी पथकाने काळबादेवी, मुंबई येथील एका अंगडिया व्यावसायिकाच्या कार्यालयावर छापा टाकून कोट्यवधींची रोकड आणि २० किलो चांदी जप्त केली आहे. जमिनीच्या आत पोकळी करून लाखो रुपयांच्या नोटा आणि चांदी व्यावसायिकाने लपवून ठेवली होती.
छोटय़ाशा कार्यालयात पोकळी बनवून करोडोंच्या नोटा ठेवत फरशा लपवून ठेवल्या. गोणीत ९.५ कोटी रोख आणि २० किलो चांदीच्या विटा अधिकाऱ्यांना सापडल्या आहेत.
आंगडिया व्यापारी यापूर्वीही वादात सापडले आहेत. त्यांच्या वतीने आयपीएस अधिकारी सौरभ त्रिपाठी यांच्यावर आरोप करण्यात आला की त्यांनी झोन-2 चे डीसीपी असताना वसुली केली होती. त्यावेळी त्याने अंगडिया व्यापाऱ्यांकडून दरमहा १० लाख रुपये हप्ते म्हणून मागितले होते.
वसुलीला कंटाळून अंगडिया व्यापाऱ्यांनी पोलिसांत तक्रार केली. दाखल केलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, आरोपी अधिकाऱ्याने डिसेंबरमध्ये अनेक वेळा आयकर विभागाला त्याच्या रोख रकमेच्या हालचाली आणि व्यावसायिक क्रियाकलापांची माहिती देण्याची धमकी देऊन त्याच्याकडून पैसे उकळले होते.
35 वर्ग फुट के दफ्तर में तहखाना बनाकर छुपा रखा था करोड़ों रुपए!! pic.twitter.com/y8fNFI4Me2
— sunilkumar singh (@sunilcredible) April 23, 2022
तक्रारीनंतर, महाराष्ट्र सरकारने आरोपी पोलिस उपायुक्त (डीसीपी) सौरभ त्रिपाठी यांना मार्चमध्ये निलंबित केले. तेव्हापासून ते फरार आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे. मात्र आजतागायत त्यांच्याबद्दल काहीही माहिती मिळालेली नाही.