Uncategorized

नाशिक – मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी सिनेअभिनेत्याची वापरली कार ! रक्ताने अंघोळघातलेला दगड सारे काही सांगतो…

नाशिक - मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी सिनेअभिनेत्याची वापरली कार ! रक्ताने अंघोळघातलेला दगड सारे काही सांगतो...

नाशिक : नुकत्याच बाप- लेकाच्या खुनाच्या घटनेने नाशिक शहरात खळबळ माजली होती.मात्र आता पुन्हा खूनाबाबत विदारक घटना समोर आली आहे. खुन केल्यानंतरही मृतदेहाची राख रांगोळी केली आहे.

आता मोखाडा पोलिसांच्या यशवंतराव चव्हाण मुक्तविद्यापीठाचे निवृत्त कुलसचिव नानासाहेबांच्या मृतदेहावर फेकलेला आणि रक्ताने माखल्याने लालबुंद झालेला दगड हाती लागला आहे. मोखाडा घाटाच्या दरीत हा दगड सापडलाने यावरूनच हत्याकांडात क्रौर्याची किती परिसीमा गाठली गेली, हे समोर येतेय. त्यामुळे तपास करणारे पोलिसही हादरून गेलेत.

याप्रकरणाचा मुख्य संशयित असणारा हॉटेल व्यावसायिक राहुल जगताप याने संपत्तीच्या हव्यासापोटी नानासाहेब कापडणीस आणि त्यांचा डॉक्टर मुलगा अमित कापडणीस यांचा अतिशय निर्घृण खून केल्याचे समोर येत आहे.

दोघांचा खून केला कसा ?

आरोपी म्हणाला… आपण तुमच्या आईचे विद्यार्थी असल्याचे सांगून माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस आणि त्यांचे पुत्र डॉक्टर अमित कापडणीस यांच्याशी हॉटेल व्यावसायिक राहुल जगतापने मैत्री केली.

नंतर डिसेंबरमध्ये आरोपीने नानासाहेब कापडणीस यांना गुंगीचे औषध देऊन शहराबाहेर नेले. पालघर जिल्ह्यातील मोखाडा घाटात त्यांचा गळा आवळून खून केला. मृतदेह दरीत फेकला. तर अमितला भंडारदरा येथे फिरण्यासाठी जाण्याच्या बहाण्याने शहराबाहेर नेत त्याचाही खून केला. त्यांचा मृतदेह वाकी घाटात जाळून फेकला.

संशयित राहुल जगतापने बाप-लेकाचा खून केल्यानंतर त्यांच्या घराच्या चाव्या गोदावरी नदीत टाकल्या. टाकळी गावाजवळील मलशुद्धीकरण केंद्राच्या पाठीमागील पुलावरून त्याने या चाव्या नदीत फेकल्या. या ठिकाणी पोलिसांनी संशयिताला नेत घटनास्थळावर दोनेक तास तपासणी केली. मात्र, त्यांना चाव्या सापडल्या नाहीत. दुसरीकडे राहुल जगतापने मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी सिनेअभिनेता जॉन अब्राहमची कार वापरल्याचे म्हटले आहे. ही रेंज रोव्हर कार त्याने गोवा येथून आणल्याचे तपासात समोर आलेय. त्यावर नाशिकचा बनावट नंबर लावला. राहुलने ही कार आपण मुंबईत एका एजंटकडून खेरदी केल्याचे म्हटले आहे. या कारच्या मालकाचा पोलिसांनी शोध सुरू केलाय.

अशी काय आहे संपत्ती?

कापडणीस कुटुंबाची नाशिकमध्ये प्रचंड जायदाद आहे. ही संपत्ती पाहून राहुलचे डोळे दीपावले. त्यातूनच त्याने कापडणीस पिता-पुत्राच्या खुनाचा कट रचला. कापडणीस यांचे पंडित कॉलनीमध्ये चार प्लॅट, सावरकरनगरमध्ये दोन मोठे बंगले, 97 लाखांचे शेअर्स ट्रेडिंग, 20 लाखांची मुदतपूर्ण ठेव, 30 लाखांची मुदतपूर्ण ठेव, देवळाली कॅम्पमध्ये टोलेजंग रो-हाऊस, नानावलीत 14 लाखांचा गाळा आहे.
इतरही त्यांची अमाप संपत्ती आहे. शिवाय कापडणीस पिता-पुत्र दोघेच नाशिकला राहायचे. त्यांची पत्नी व मुलगी मुंबईला राहायच्या. याचाच फायदा संशयिताने उठवला. त्यांचा खून करून यांच्या खात्यावरील मोठी रक्कम आरटीजीएसद्वारे आपल्या खात्यावर वर्ग केली. कापडणीस यांच्या खात्यातून शेअर्स विकत पैसे काढले. या आधारे पोलिसांनी राहुल जगतापला बेड्या ठोकल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button