MaharashtraTrending News

कर्मचाऱ्यांना पेन्शन नव्हे, उलटे लटकुन लावण्या झोडा…

कर्मचाऱ्यांना पेन्शन नव्हे, उलटे लटकुन लावण्या झोडा...

यवतमाळ , यवतमाळ मधील येवद्याचे सामाजिक कार्यकर्ते नकुल सोनटक्के यांचे वादग्रस्त वक्तव्य केल्याने खळबळ उडाली आहे

शासनाने संपात सहभागी असलेल्यांचे निलंबन करावे
दर्यापूर – सुशिक्षित बेरोजगार असलेली लाखो तरुणाई मिळेल ते काम करून तट्टपुंजा पगारात राबत आहे. त्यांच्या वर्तमानाचा बिकट प्रश्न आहे. शेतकरी-कामगारांच्या अनंत अडचणी आहेत. अशातच ज्यांची जुनी पेन्शन लागू केल्यास राज्याच्या तिजोरीवर मोठा भुर्दंड पडणार आहे, अशा महिन्याकाठी लाखोंचं वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना कशाला हवी जुनी पेन्शन, असा प्रश्न उपस्थित करत येवद्याचे सामाजिक कार्यकर्ते नकुल सोनटक्के यांनी.

Whatsapp Group Join
Telegram channel Join

कर्मचाऱ्यांना पेन्शन नव्हे तर उलटे लटकून फटके व लावण्या झोडायला पाहिजे असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे नवा वाद उफाळून येणार असल्याचे निश्चित आहे.

जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आजपासून राज्य शासनाच्या विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांनी संप घोषित केला आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांचे कामकाज अडचणीत सापडल्याने येवदा येथील सामाजिक कार्यकर्ते नकुल सोनटक्के हे चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

Whatsapp Group Join
Telegram channel Join

यासंदर्भात बोलताना सोनटक्के म्हणाले की, ज्यांच्या भूत भविष्य आणि वर्तमानाचा मोठा प्रश्न उभा ठाकला असतानाच राज्यभरात शेकडो तरुण युवक-युवती हाताला मिळेल ते काम करून तटपूंजा पगारात चरितार्थ चालवतात आहेत.

ज्यांच्या वर्तमानाचा प्रश्न पूर्णपणे निकाली निघाला अशांनी भविष्याची आस लावून शासनाला वेठीस धरण अत्यंत चुकीचे आहे. शासनाने आधी सुशिक्षित तरुण युवकांच्या वर्तमानाचा प्रश्न सोडवावा नंतर कर्मचाऱ्यांच्या फालतू अर्थहीन पेन्शनच्या मुद्द्यावर लक्ष द्यावे. शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही. शेतकरी आत्महत्येचा प्रश्न दिवसेंदिवस भयावह रूप धारण करत आहे. छोट्या उद्योगांचा कणा मोडला आहे.

अशातच कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना लागू केल्यामुळे राज्याला मोठ्या आर्थिक भुर्दड पडणार असल्याचे दस्तूर खुद्द वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले असतानाही शासनाला वेठीस धरणे म्हणजे एकप्रकारे हा राजद्रोह आहे. त्यामुळे संपात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांचे तत्काळ निलंबन करावे, अशी मागणी नकुल सोनटक्के यांनी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्याकडे केली आहे. तसेच सुशिक्षित बेरोजगार तरुणाईला तत्काळ शासन सेवेत घ्यावे, शासनला जर या संदर्भात काही अडचण येत असेल तर संपूर्ण अमरावती जिल्ह्यात उच्चविद्या विभूषित तरुणाई आपण या भरती करता उपलब्ध करून देऊ असेही सोनटक्के यांनी जाहीर केले आहे.

लाखोंचे वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन नव्हे तर उलटे लटकून फटके मारायला पाहिजे असे सोनटक्के यांनी जाहीर केल्याने नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. पदवीधर आमदार व शिक्षक आमदार यांच्यावर टीका करत सोनटक्के म्हणाले की, मोठ्या वेतनाची नोकरी असलेल्या लोकांना कशाला हवा आमदार. दोन्ही आमदार रद्द करून केवळ बेरोजगारांचा आमदार असावा अशीही भूमिका त्यांनी घेतली आहे.

यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांची भूमिका स्वागताहार्य
कंत्राटी कर्मचारी, कोतवाल कर्मचारी, पोलीस पाटील कर्मचारी, आपले सरकार केंद्रातील कर्मचारी, सेतू केंद्रातील कर्मचारी, अंगणवाडी सेविका-कर्मचारी, होमगार्ड इत्यादी संवर्गातील सेवा अधिग्रहीत करून शासनाचे काम सुरळीत ठेवण्याचे आदेश यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल एडगे यांन जारी केले आहेत. त्यांच्या या आदेशाचे नकुल सोनटक्के स्वागत केले असून अतिशय कमी पगारात काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना त्यांनी पाठबळ द्यावे.

तसेच नवीन भरती सुद्धा तत्काळ करावी अशी मागणी सुद्धा आपण मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचेही नकुल सोनटक्के यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button