Uncategorized

नाशिकमध्ये आयटी पार्क प्रकल्पाचे ”या दिवशी” फुटणार नारळ, 2 लाख रोजगार निर्मितीचा दावा…

नाशिकमध्ये आयटी पार्क प्रकल्पाचे ''या दिवशी'' फुटणार नारळ, 2 लाख रोजगार निर्मितीचा दावा...

नाशिक : सध्या नाशिक महानगर पालिका निवडणुकीचे वारे वाहत असून निवडणूक तोंडावर असतांना. मात्र प्रत्येक पक्ष आपल्या बाजून जास्तीत उमेदवार निवडून येण्यासाठी आपल्या परीने शकल लढविण्याचे काम सुरु आहे.आता सत्ताधारी भाजपने (BJP) बहुचर्चित अशा आयटी पार्कच्या शिडात हवा भरलीय. येत्या 1 मार्च रोजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थिती विविध करार करून उद्घाटनाचा नारळ फोडण्याचा इरादा पक्का केलाय. नाशिकमधील आडगाव-म्हसरूळ शिवारात 335 एकर जागेवर हे आयटी हब उभारण्यात येणार आहे.

नासिक शहराच्या विकासाठी भाडेतत्वावर जागा द्यायला जागामालक राजी असल्याचे समजते. महापालिका आणि आयटी डेव्हलपर यांच्या यासाठी करार होईल. त्यांना 33 वर्षांच्या भाडेकरारावर ही जागा मिळेल. त्यामुळे नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात रोजागार निर्मिती होईल. तरुणांना इतर शहरात वणवण भटकावे लागणार नाही, अशी माहिती महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिली आहे.

20 कोटींचा निधी मंजुर

केंद्र सरकारने नाशिक आयटी पार्कला हिरवा कंदील दाखवला असून,मुंबई-पुणे नंतर आता नाशिकमध्ये सुद्धा आयटी हब होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आयटी हब उभारण्यासाठी लागणाऱ्या सर्व सोयी-सुविधांसाठी 20 कोटी रुपये मंजूर केले आहेत. या पार्कमुळे नाशिकमधील तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध होईल.
नाशिक शहरात रोजगार उपलब्ध होणार

शहरात दोन लाख रोजगार निर्माण होतील. मुलांना आयटी हबसाठी मुंबई, पुणे, बंगळुरूला जावे लागणार नाही, असा दावा महापौर सतीश कुलकर्णी यांनी केला आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसचीही हरकत

विरोधी पक्षात असलेल्या शिवसेना, काँग्रेस, मनसे आणि राष्ट्रावादीच्या नगरसेवकांनी देखील होऊ घातल्या IT हब उभारणीची प्रक्रिया संशयास्पद असल्याचा आरोप करत प्रक्रियेला विरोध यापूर्वीच केला आहे. शहरात अनेक जागा असून त्या इतर जागा सोडून एकाच जागेची निवड या हबसाठी का केली गेली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.

भाजपमधून विरोध

आयटी पार्क ज्या भागात उभारले जात आहे. त्या भागात केवळ बिल्डरांच्या जमिनी असून या आयटी पार्कसाठी ज्या सुविधा उभारल्या जातील, त्यातून केवळ त्या भागातील बिल्डरांच्या जमिनीचा भाव वाढून त्याचा फायदा केवळ बिल्डरांना होईल, असा आरोप होत आहे.

विशेषतः आयटी हबचा विषय महासभेत आणण्यापूर्वी आर्थिक देवाणघेवाण झाली असून आपण या विरोधात अँटी करप्शन विभागाकडे तक्रार करणार असल्याचा इशारा भाजपाच्याच नगरसेवकांनी यापूर्वी दिला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button