नेमकी इंदुरीकर महाराज यांची गाडी कशी आदळली ट्रॅक्टरवर…
सुप्रसिद्ध इंदुरीकर महाराज यांच्या गाडीचा नेमका कसा झाला अपघात...
जालना : कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या कारचा अपघात झाला आहे. जालन्यात त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. बुधवारी रात्री दहाच्या सुमारास परतूरमध्ये हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.
बदनापूरहून खांडवीकडे जाताना हा अपघात झाला असून रस्ता ओलांडताना ट्रॅक्टरवर स्कॉर्पिओ आदळली. बुधवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
सुदैवाने अपघातातून इंदुरीकर महाराज बचावले आहेत. त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. दरम्यान त्यांच्या गाडीचा चालक मात्र अपघातात जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इंदुरीकर महाराज गाडीने परतूर येथील खांडवी वाडी येथे जात होते. यावेळी इंदुरीकर महाराज यांच्या स्कॉर्पिओ गाडीने ट्रॅक्टरला धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच तेथील स्थानिकांनी घटनास्थळी पोहोचत मदत केली. सुदैवाने अपघातात इंदुरीकर महाराज जखमी झाले नाहीत. त्यांचा चालक मात्र किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
सुप्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या चारचाकी वाहनाला जालन्यातील परतूर शहरातील साईनाथ कॉर्नरवर किरकोळ अपघात झाल्याची घटना घडली. परतूर तालुक्यातील खांडवीवाडी इथं कीर्तनासाठी जात असताना साईनाथ कॉर्नरवरील हॉटेल मधूबन समोर रस्ता क्रॉस करणाऱ्या एका ट्रॅक्टरवर आदळून हा अपघात झाला.
एमएच १२ टीवाय १७४४ या क्रमांकाच्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओने ते प्रवास करत होते. या अपघात इंदुरीकर महाराजांना कोणतीही इजा झाली नसून गाडीचा चालक संजय गायकवाड किरकोळ जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच परतुरचे पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले.
जखमी चालकाला पोलिसांच्या मदतीने शहरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर अपघात स्थळावरून इंदुरीकर महाराज यांना दुसऱ्या वाहनाने खांडवीवाडी इथं पोहचवण्यात आलं. या ठिकाणी त्यांचं कीर्तन नियोजित वेळेत पार पडलं. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच शहरातील नागरीकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.