देश-विदेश

बायको सासरी राहत नसल्यास लग्न रद्द होणार …. सुप्रीम कोर्टाचा निर्णय

बायको सासरी राहत नसल्यास लग्न रद्द होणार .... सुप्रीम कोर्टाचा निर्णय

नवी दिल्ली : आता सासरी राहत नसलेल्या महिलांबाबत कोर्टाकडून महत्वपुर्ण निर्णय देण्यात आला आहे. देशात असंख्य महिला पती पासून दुर माहेरी किवा वेगळे राहणे पसंद करत असतात.यामुळे अनेकांचे जीवन निघून गेले आहे.अश्याच एका सासरी राहत नसल्याच्या कारणाने सुप्रीम कोर्टाने एका महिलेचे लग्न रद्द केले असल्याचे प्रकरण समोर आले आहे.

संबंधित महिलेकडून वैवाहिक संबंध जोपासण्यासाठी कोणताही प्रयत्न करण्यात आला नाही. २००९पासून ती पतीपासून वेगळी राहत असल्याने हे लग्न रद्द करण्यात येत आहे,असे न्यायमूर्ती अजय रस्तोगी आणि अभय एस. ओका यांच्या खंडपीठाने सांगितले.

नेमकं काय आहे प्रकरण –

आसाममधील तेजपूरमध्ये महिलेचा पती व्यवसाय करत असून पत्नी गुवाहाटी येथील महाविद्यालयात काम करते. १ जुलै २००९पासून ते वेगळे राहत होते. पतीच्या आईच्या मृत्यूमुळे ती डिसेंबर २००९मध्ये पतीच्या घरी गेली आणि तिथे फक्त एकच दिवस राहिली. त्यानंतर मात्र, तिथे ती परतली नाही. विशेष म्हणजे, तिथे राहत नसतानाही तिने पतीच्या कुटूंबातील पुरुष सदस्यांविरुद्ध बलात्काराची तक्रार नोंदवली होती. मात्र, त्यात कोणतेच तथ्य सापडले नसल्याने या तक्रारीही खंडपीठाने फेटाळून लावल्या आहेत.

बलात्कार प्रकरणाशी संबंधित एफआयआर रद्द करण्याचे आदेश देताना न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांच्या खंडपीठाने महिलांकडून असे खोटे आरोप लावले जाण्याविषयी चिंता व्यक्त केली. खंडपीठाने म्हटले की, केवळ वैवाहिक प्रकरणांमध्ये दबाव निर्माण करण्यासाठी पतीच्या कुटुंबातील पुरुष सदस्यांविरुद्ध बलात्काराच्या तक्रारी नोंदवण्याची वाढती प्रकरणं पाहून वाईट वाटते.या प्रकरणाच्या सुनावणीवेळी संबंधित महिलेकडून वैवाहिक संबंध पुन्हा सुरू व्हावा, यासाठी कोणतेही सकारात्मक पाऊल उचलण्यात आले आहे. तसेच वैवाहिक हक्क बहाल करण्यासाठी याचिकाही दाखल केली नाही.

तसेच पती – पत्नीने कौटुंबिक न्यायालयात परस्पर संमतीने घटस्फोटासाठी याचिका दाखल करण्यात आली असून दोन्ही पक्षांमधील विवाह विरघळला आहे, असेही खंडपीठाने नमूद केले. तिने सासरच्या पुरुषांविरुद्ध केलेल्या तक्रारीमुळे हा वाद चिघळला होता. मात्र, ते आरोपच खोडून काढण्यात आल्याने हे लग्न रद्द ठरवून प्रकरण निकाली काढण्यात आले. दरम्यान, या प्रकरणात सामंजस्य दाखवत पतीने भरणपोषणाचे दावे मान्य केले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button