महाराष्ट्रातील “या” शहराला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपले !
महाराष्ट्रातील "या" शहराला मुसळधार पावसाने झोडपले !

बारामती – महाराष्ट्रात पाऊस पडण्यासाठी अवघे काही दिवस राहीले आहे मात्र यंदा पावसाळा लवकर आहे असा हवामान विभागाचा अंदाज दिला आहे.आज ढगांचा गडगडाट…. विजांचा लखलखाट…. व सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाने आज संध्याकाळी बारामती शहराला अक्षरशः झोडपून काढले. अचानक आलेल्या पावसाने अक्षरशा नागरिकांची तारांबळ उडवली.
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून महाराष्ट्रात ढगाळ वातावरणसह बारामती शहरात आभाळ भरून येत होते, मात्र पावसाने हुलकावणी दिली. आज संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमारास मुसळधार पावसाने बारामतीत हजेरी लावली.
पावसापेक्षाही वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्या. अनेक ठिकाणी वाऱ्याचा वेग एवढा प्रचंड होता की काचा हलत होत्या. या वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे सगळीकडे धुळीचे साम्राज्य पसरले होते, त्यामुळे समोरचे काही दिसत नव्हते.
विजांचा लखलखाट सुरू होताच काही क्षणातच शहरातील वीज पुरवठा खंडित झाला. पावसापेक्षाही वाऱ्याचा वेग प्रचंड होता. वादळाने बारामती शहराला झोडपून काढले अशीच परिस्थिती होती. या वादळाच्या तडाख्या मध्ये लोक स्थिर उभे राहू शकत नव्हते. पावसाची तीव्रता अधिक होती.
काही क्षणातच बारामती शहरातील रस्त्यांना या पावसाच्या पाण्याने नदीचे स्वरूप प्राप्त झाले. सखल भागात पाणी साचले होते.वाऱ्याच्या प्रचंड वेगाने भीतीमुळे अनेकांनी आपल्या दुकानांची शटर्स लावून घेतली.
वादळाचा वेग एवढा प्रचंड होता की काही कळे पर्यंतच अनेकांच्या दुकानांमध्ये धूळ व बाहेरील कचरा दुकानात शिरला होता.