यंदाच्या दिवळीत फटाके घेण्यापुर्वी हि बातमी वाचा ! अन्यथा घरातच फोडावे लागेल फटाके
यंदाच्या दिवळीत फटाके घेण्यापुर्वी हि बातमी वाचा ! अन्यथा घरातच फोडावे लागेल फटाके

Maharashtra Rain : यंदा पावसाने जास्तच मनावर घेतले आहे.दिवाळी आली तरी सध्या पाऊस पाठ सोडायला तयार नाहीये. पावसात ऑक्टोबर (October) महिना उजाडला. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि त्यामागोमाग दसराही झाला. अवघ्या काही दिवसांवर आता दिवाळी (Diwali 2022) येऊन ठेपली. पण तरीही पाऊस काही जाण्याचं नाव घेत नाहीये.आता अजून किती दिवस शेतक-याचे नुकसान होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार अद्यापही परतीचा पाऊस महाराष्ट्राच दाखल झाला नसून, त्याची वाट गुजरातमध्येच अडली आहे. ज्यामुळं महाराष्ट्रात ऐन ऑक्टोबरमध्ये कधी कडाक्याचं ऊन तर, कधी मुसळधार पाऊस पडताना दिसत आहे.यामुळे बळी राज्याचे हातातोंडाशी आलेले पिक जाते की काय ? याचा राज्यातील शेतक-यांना सामना करावा लागत आहे.
ऐन दिवाळीच्या दिवसांमध्येही हवामान खात्याकडून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. थोडक्यात यंदाची दिवाळी या पावसाच्या हजेरीमुळे ओलीचिंब असणार असंच म्हटलं जात आहे.संकटांची ही रांग इतक्यावरच संपत नाहीये. किंबहुना तुम्ही जर दिवाळीत हा पाऊस नसेल, मग आम्ही मस्त सुट्टीसाठी (Diwali Holidays) कुठेतरी बाहेर जाऊ अशी आशा बाळगत बेत आखत असाल तर आताच सावध व्हा.
याआधी म्हणजेच 15 ते 17 ऑक्टोबरमध्ये कोकण, पुणे, अहमदनगर, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे.मात्र आता 20 ते 24 ऑक्टोबरदरम्यान मगाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
नेमकं काय आहे या मागचं कारण का वाढतोय पावसाळा ?
पाऊस होण्यामागे काही महत्त्वाच्या गोष्टी कारणीभूत ठरत आहेत. यामधील सर्वात गंभीर कारण म्हणजे जागतिक तापमान वाढ. ज्यामुळं पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रातही बदल गो असून, यामुळं सातत्यानं कमी दाबाचे पट्टे तयार होत आहेत. परिणामी ढगफुटी (Cloudburst) आणि वादळांच्या (Cyclone) घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांमधील पर्जन्यमानाचा अंदाज घेतला, तर आता पावसाळा हा ऋतू आता चार महिन्यांपुरताच मर्यादित राहिलेला नसून, कमीजास्त प्रमाणात तो वर्षभर हजेरी लावताना दिसत आहे.