Vahan Bazar

बॅंकेने ओढून आणलेली कार पाहिजे का, येथे एर्टीगा मिळतेय फक्त 55 हजारात, जाणून घ्या सविस्तर – canara bank ertiga car auction

बॅंकेने ओढून आणलेली कार पाहिजे का, येथे एर्टीगा मिळतेय फक्त 55 हजारात, जाणून घ्या सविस्तर - canara bank ertiga car auction

पुणे : Canara Bank Ertiga Car Auction – सध्या नवरात्री उत्सव मोठ्या धुमधडक्यात साजर केला जात आहे. उद्या दसरा सण्याच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात गाड्याची खरेदी केली जात असते, या दरम्यान सेंकडम हॅन्ड गाड्यांची खरेदी विक्री देखील मोठ्याप्रमाणात केली जाते. मात्र आता सेंकड हॅन्ड गाड्या खरेदी करणा-यांसाठी मोठी स्वर्ण संधी उपलब्ध झाली आहे आता. 55 हजार रुपयांमध्ये तुम्हाला एर्टीगा कार खरेदी करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. ज्यांना कमी बजेटमध्ये मोठ्या कुटुंबासाठी योग्य आणि विश्वासार्ह गाडी हवी आहे, त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन होऊ शकतो.

आता कमी बजेटमध्ये कार खरेदी करणा-यासाठी कॅनरा बँकेकडून एक सोनेरी संधी उपलब्ध करुन दिली आहे. कॅनरा बँक शिवाजीनगर, पुणे शाखेने येथे एक मारुती एर्टिगा एसयुव्ही लिलावासाठी ठेवली आहे, ज्याची किमान किंमत (रिझर्व्ह प्राईस) केवळ ५५,००० रुपये ठेवली आहे. तुम्हाला स्वस्त किमतीत कार खरेदी करायची असल्यास तुम्ही या लिलावात सहभागी होऊ शकतात.

Whatsapp Group Join
Telegram channel Join

बॅंकेने ओढून आणलेल्या गाड्या – Canara Bank Ertiga Car Auction

Canara Bank Ertiga Car Auction
Canara Bank Ertiga Car Auction

जे लोक कर्ज काढून गाडी खरेदी करतात, मात्र ते वेळेवर किंवा बॅंकेचे हप्ते भरणे शक्य नाही आशा लोकांचा गाड्या बॅंक जमा करत असतात . त्यामुळे बॅंकेला मोठ्यानुसानाला सामोरे जावे लागते. बॅंकेचे हे नुकसान भरुन काढण्यासाठी बॅंक या गाडीचा पुन्हा लिलाव काढून विक्री करत असते.

बॅंकेचा लिलाव म्हणजे काय

बॅंकेने जप्त केलेल्या गाड्या पुन्हा विक्रीसाठी काढत असतात पण त्यागाडीची स्थिती पाहता बॅंक आपले पैसे मोकळे करण्यासाठी बॅंक या गाड्या स्वस्त किंमतीत विक्री करत असतात. ज्या ग्राहकांना या गाड्या खरेदी करायच्या आहे त्यांनी बॅंकेने दिलेली किंमतीच्या पुढील किंमत बोलावी लागते जो व्यक्ती वाढीव किंमत बोलेल त्या व्यक्तीकडे या गाडी मालकी दिली जात असते.

बॅंक लिलावाची माहिती

लिलावाची माहिती थोडक्यात:

बँक: कॅनरा बँक (पुणे रीजनल ऑफिस)

गाडी: मारुती एर्टिगा (रजिस्ट्रेशन: MH 14 GD 5743)

रजिस्ट्रेशन तारीख: १८ ऑक्टोबर २०१७

लिलाव तारीख: ७ ऑक्टोबर २०२५

लिलाव वेळ: सकाळी ११:०० ते दुपारी १२:००

किमान किंमत: ₹ ५५,०००

EMD रक्कम : ₹ ५,५००

अर्ज भरण्याची शेवटची तारीख: ६ ऑक्टोबर २०२५, संध्याकाळी ५:००

गाडीबाबत महत्त्वाचे मुद्दे:

ही गाडी ‘साल वेंकटेश टूर्स अँड ट्रॅव्हल्स’ या प्रवासी वाहतूक कंपनीकडून बँकेने SARFAESI कायद्याखाली जप्त केली आहे. एर्टिगा ही ७-खुर्चीची, इंधनक्षम एमपीव्ही गाडी म्हणून ओळखली जाते, जी कुटुंबियांसाठी तसेच छोट्या व्यवसायासाठी देखील उत्तम आहे. केवळ पन्नावाव हजार रुपये सुरुवातीच्या किमतीत अशी गाडी मिळणे ही एक विरळच संधी आहे.

लिलावात सहभागी होण्यासाठी पायऱ्या:

१. संपर्क करा: लिलावाआधी गाडी बघण्यासाठी आणि इतर तपशीलांसाठी दिलेल्या संपर्क क्रमांकावर (९८६००३३३६८ किंवा ९९८१६७३०५७) किंवा टेलिफोन नंबर (०२०-२५५१०००७) वर संपर्क साधावा.
२. गाडी तपासा: लिलावापूर्वी गाडीची सर्वांगीण तपासणी करणे अत्यावश्यक आहे. इंजिन, बॉडी, सस्पेंशन आणि कागदपत्रे यांची काळजीपूर्वक छाननी करावी.
३. EMD भरा: लिलावात बोली लावण्यासाठी ₹ ५,५०० रुपयांची गंभीरतेची रक्कम (EMD) बँकेकडे जमा करावी लागेल.
४. अर्ज सबमिट करा: ६ ऑक्टोबर २०२५, संध्याकाळी ५:०० च्या आधी सर्व आवश्यक अर्ज आणि दस्तऐवज सादर करावे लागतील.

सल्ला: बँकेतील लिलाव हा एक गंभीर व्यवहार आहे. जरी किंमत आकर्षक असली तरी, गाडीची यांत्रिक स्थिती आणि कागदोपत्री बाबींची खात्री करून घेणे गरजेचे आहे. लिलावात सहभागी होण्यापूर्वी सर्व अटी आणि नियम काळजीपूर्वक वाचून घ्यावेत. ही संधी गमावू नका! जर तुम्हाला सहा-सात वर्षे जुन्या, पण चांगल्या स्थितीतील एर्टिगाची आवश्यकता असेल, तर हा लिलाव तुमच्यासाठीच आहे.

टिप – गाडी मिळण्या अगोदर कुठलेही प्रकारे अर्थिक व्यव्हार करु नये, या जबाबदार वेगवान न्यूज राहणार नाही .

Whatsapp Group Join
Telegram channel Join

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button