असं काय घडलं ! ड्युटीला वैतागून बीएसएफ कॉन्स्टेबलने आपल्या साथीदारांवर झाडल्या गोळ्या,10 जण जखमी, 5 जण ठार…
असं काय घडलं ! ड्युटीला वैतागून बीएसएफ कॉन्स्टेबलने आपल्या साथीदारांवर झाडल्या गोळ्या,10 जण जखमी, 5 जण ठार...

नवी दिल्ली : पंजाबमधील अमृतसर येथील खासा येथील बीएसएफ मेसमध्ये गोळीबारामुळे 5 जणांचा मृत्यू झाला, मिळालेल्या माहितीनुसार, आपल्या कर्तव्यावर नाराज झालेल्या बीएसएफ जवानाने रविवारी सकाळी मेसमध्ये आपल्या सहकाऱ्यांवर गोळीबार सुरू केला. या घटनेत आतापर्यंत 5 बीएसएफ जवान शहीद झाले आहेत, गोळीबार करणारा बीएसएफ जवान कॉन्स्टेबल सत्तेप्पा याने आपल्या साथीदारांना गोळ्या झाडल्यानंतर स्वत:वर गोळी झाडली. या घटनेत गोळीबार करणाऱ्या सत्तेप्पाचाही मृत्यू झाला आहे.
बीएसएफच्या मेसमध्ये गोळीबार झाल्याच्या वृत्तामुळे दहशतीचे वातावरण आहे. गोळीबारानंतर लगेचच सर्व जखमींना गुरुनानक देव रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला.
गोळीबारात जखमी झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांची अवस्था बिकट आहे. अमृतसर बीएसएफ मेस गोळीबाराच्या घटनेनंतर बीएसएफ अधिकारी म्हणाले, ही दुर्दैवी घटना आहे. गोळीबाराची कारणे शोधण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेत शहीद झालेल्या जवानांमध्ये हेड कॉन्स्टेबल डीएस तोरस्कर, हेड कॉन्स्टेबल बलजिंदर कुमार, कॉन्स्टेबल रतन चंद यांचाही समावेश आहे.