Vahan Bazar

किंमत फक्त 39 हजार रुपये, 1 लिटर पेट्रोलमध्ये धावते 110 किमी,येथे पहा देशातील सर्वात स्वस्त बाईक

किंमत फक्त ३९ हजार रुपये, १ लिटर पेट्रोलमध्ये धावते ११० किमी,येथे पहा देशातील सर्वात स्वस्त बाईक

Best Cheapest Bikes: दिवसेन दिवस वाहनाची किंमती वाढतच चालल्या आहे. तसेच भारतीय बाजारामध्ये बाईक्सची डिमांड नेहमी वाढत आहे.प्रत्येकाचे स्वप्न असते की कमी किंमत, जबरदस्त मायलेज आणि लो मेंटनेंस असलेली गाडी घेण्याची ईच्छा आहे.त्यामुळे जास्तीत जास्त मायलेज असलेल्या अशा बाइक्सकची खूप विक्री होत असतात.सध्या बाजारमध्ये उपलब्ध असलेल्या या बाइक्सला स्टायलिश डिझाइनसह, कमी बजेट मध्ये चांगले आणि दमदार इंजिनसह उपलब्ध करण्यात आले आहे.

आता तुम्ही सुद्धा परवडणाऱ्या, कमी किंमतीत उपलब्ध असणाऱ्या बाईक खरेदी करण्याचा विचार करताय? तर, आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलोय सर्वोत्कृष्ट बाईकचे पर्याय ज्यांची देशभरात मोठ्याप्रमाणात विक्री होते. अश्याच काही शानदार मायलेजलह स्वस्त आणि किफायतशीर असणाऱ्या मोटारसायकल बाबत माहिती देणार आहे.

Whatsapp Group Join
Telegram channel Join

जास्तीत जास्त मायलेज आणि जबरदस्त बाईक्स

Whatsapp Group Join
Telegram channel Join

बजाज CT110X : Bajaj CT 110X
आता बजाजचा CT110X त्याच्या बोल्ड लूकमुळे ग्राहकांच्या पसंतीस उतरला आहे. या बाईकमध्ये ११५.४५ cc इंजिन आहे जे ८.६ PS पॉवर आणि ९.८१ Nm टॉर्क देते. हे इंजिन ४ स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. ही बाईक किक आणि इलेक्ट्रिक स्टार्टने सुसज्ज आहे बाईकचा टॉप स्पीड ९० किमी प्रतितास आहे. ही बाईक एक लिटरमध्ये ७०-७२ kmpl मायलेज देऊ शकते. या बाईकच्या मागील बाजूस एक वाहक दिलेला आहे, जिथे तुम्ही तुमचे सामान ठेवू शकता. बाईकची एक्स-शोरूम किंमत ६७,३२२ रुपये आहे.

TVS XL100

TVS मोपेड बाईक XL100 ला खूप पसंत केले जात आहे. ही बाईक वैयक्तिक आणि व्यावसायिक वापरासाठी वापरली जाते. उत्तर प्रदेशमध्ये या बाईकची एक्स-शोरूम किंमत ३९,९०० रुपयांपासून सुरू होते. TVS XL 100 मध्ये ९९.७ cc ४ स्ट्रोक, इंधन तंत्रज्ञानासह सिंगल सिलेंडर इंजिन आहे जे ४.३ bhp पॉवर आणि ६.५ Nm टॉर्क निर्माण करते. ARAI नुसार, ही बाईक ८० किलोमीटरचा मायलेज देते.

टीव्हीएस स्पोर्ट्स :TVS Sports

ही बाईक स्पोर्टी डिझाइनमध्ये येते. यात ११०cc इंजिन आहे जे ८.२९PS पॉवर आणि ८.७Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ४ स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सनुसार, या बाईकने मायलेजमध्ये नवा रेकॉर्ड बनवला आहे. रेकॉर्डनुसार, TVS स्पोर्ट एका लिटरमध्ये ११०.१२ kmpl मायलेज देते. बाईकचा टॉप स्पीड ९० किमी प्रतितास आहे. TVS स्पोर्टची किंमत ६१,५०० रुपयांपासून सुरू होते.

हिरो HF100 : Hero HF 100

Hero MotoCorp ची HF 100 ही परवडणारी आणि टिकाऊ बाईक आहे. ARAI नुसार, ही बाईक ८३ kmpl पर्यंत मायलेज मिळवू शकते. या बाईकमध्ये ९७.२cc इंजिन आहे, जे ८.३६ PS पॉवर आणि ८.०५Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ४ स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. बाईकच्या पुढील आणि मागील चाकांमध्ये ड्रम ब्रेक उपलब्ध आहेत. त्याची एक्स-शो रूम किंमत ५४,९६२ रुपयांपासून सुरू होते.

Whatsapp Group Join
Telegram channel Join

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button