Vahan Bazar

बडोदा बँकेने ओढून आणलेली कार, महिंद्रा XUV300 फक्त 1 लाख 3 हजारात, एर्टिगा, बलेनो स्वस्तात खरेदी करण्याची सुवर्णसंधी – bank of baroda car auction

बडोदा बँकेने ओढून आणलेली कार, महिंद्रा XUV300 फक्त 1 लाख 3 हजारात, एर्टिगा, बलेनो स्वस्तात खरेदी करण्याची सुवर्णसंधी - bank of baroda car auction

नवी दिल्ली : “बँकेने ओढून आणलेली कार” हा शब्द ऐकल्यावर डोळ्यासमोर सेंकड हॅन्ड, किंवा जास्त वापरलेली गाडी येते का? तर मग आपणास एक आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदा सारख्या बॅंका दरवर्षी शकडो वाहने लिलावतात काढत असतात, सर्वात महत्वाची बाब म्हणजे या लिलावात बर्याचदा अगदी नवीन मॉडेल्स, चांगल्या स्थितीतील गाड्या असतात. ही वाहने मूळ मालकाकडून कर्ज फेड न झाल्यामुळे बँकेने जप्त केलेली असतात आणि आता ती सामान्य लोकांसाठी सवलतीच्या किमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

जर तुम्हाला 1 लाखात गुड कंडिशन कार कार खरेदी करायची असल्यास तुमच्यासाठी बॅंकेने ओढून आणलेल्या कारची डील फायद्याची होऊ शकते, तुम्हाला प्रश्न पडला असेल एवढ्या स्वस्त किंमतीत कार मिळणार कशी, मात्र हि बातमी खरी आहे, याबाबतची प्रेस नोट आमच्याकडे आहे. आम्ही खाली अपलोड करणार आहोत. समजून घेऊ या बॅंकेने ओढून आणलेल्या कार म्हणजे काय ?

Whatsapp Group Join
Telegram channel Join

बॅंकेने ओढून आणलेल्या गाड्या, कार्स

काल्पिक चित्र
काल्पिक चित्र

प्रत्येक व्यक्तीला गाडी खरेदी करण्याचे क्रेज असते, ती छोटी असो की मोठी मात्र त्यावेळी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नसतात त्यामुळे ते बॅंकेचा आधार घेऊन, बॅंकेकडून कार किंवा गाडी खरेदीसाठी कर्ज घेत असतात. बॅंक मोठ्या प्रमाणात नवीन गाड्या किंवा कार्स खरेदीसाठी कर्ज पुरवठा करत असतात. जास्तीच्या व्याजदराने घेतलेले किंवा अर्थिक परीस्थिती खालवणे या सारखे प्रकार घडत असतात त्यामुळे बॅंक ग्राहकांचे घेतलेल्या कर्जाचे हप्ते वेळेवर जात नाही, त्यामुळे बॅंक वाहन जप्तीची कारवाई करत असते. मात्र आपले नुकसान भरुन काढण्यासाठी या गाड्याची पुन्हा विक्री करावी लागते.

बॅंका स्वस्तात कार का विकतात

देशातील सर्वच बॅंक कारसाठी कर्ज पुरवठा करतांनी 60 ते 70 टक्के कर्ज पुरवठा करत असतात उर्वरीत पैसे ग्राहक भरत असतो, त्यामुळे बॅंकेला फक्त त्यांनी आदा केलेली रक्कम परत मिळवायची असते, तसेच
गाडी मालकाने अगोदरच काही पैसे बॅंकेचे परतफेड केलेली असते, त्यामुळे बॅंकेला स्वस्त किंमतीत गाड्या देतांना काही वाटत नाही.

अलीकडेच जाहीर झालेल्या लिलाव यादीनुसार, गुजरातमध्ये तीन आकर्षक गाड्या बोलीसाठी ठेवल्या आहेत. यापैकी एकाही गाडीला तुम्ही कमी म्हणू शकणार नाही ही कार अगदी आपण रोडवरून जाताना बघितलेल्या सर्वसाधारण गाड्यांसारखीच आहेत.

१. अहमदाबादमधील ‘सॉलिड’ एसयुव्ही: महिंद्रा XUV300

ठिकाण: अहमदाबाद

लिलाव तारीख आणि वेळ: १७ ऑक्टोबर २०२५, सकाळी ११:०० ते दुपारी २:००

रिझर्व्ह प्राईस (किमान किंमत): ₹१,०३,५००

ईएमडी (गंभीरतेची रक्कम): ₹१०,३५०

ही गाडी खरोखरच ग्राहकांना अकर्षित करुन घेणारी आहे. ही एक महिंद्रा XUV300 डिझेल W8 मॉडेल आहे, जी त्याच्या भक्कम बांधणी आणि चांगल्या मायलेजसाठी ओळखली जाते. गाडीचा रंग नेपोली ब्लॅक आहे. रिझर्व्ह प्राईस फक्त ₹१,०३,५०० रुपये ठेवला आहे, जो या मॉडेलच्या बाजारभावाच्या तुलनेत खूपच कमी आहे. गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर GJ27CM2780 आहे. बँकेने स्पष्ट केले आहे की गाडीवर ‘बँक ऑफ बडोदा’ यांचा हक्क (Encumbrance) आहे, म्हणजेच खरेदीदाराला मालकी हक्कासाठी कोणतीही अडचण येणार नाही. संपर्कासाठी Ms. Pragya Tiwari (8488802159) यांचा नंबर दिला आहे. ज्यांना हि गाडी हवी असल्यास तुम्ही फोन करुन माहिती घेऊ शकता.

२. वडोदरा मधील फॅमिली कार: मारुती सुझुकी एर्टिगा

ठिकाण: वडोदरा

लिलाव तारीख आणि वेळ: १७ ऑक्टोबर २०२५, दुपारी २:०० ते संध्याकाळी ६:००

रिझर्व्ह प्राईस: ₹५,०४,०००

ईएमडी: ₹५०,४००

ज्यांना मोठ्या कुटुंबासाठी आरामदायक गाडी हवी आहे, त्यांच्यासाठी वडोदरा येथील ही एर्टिगा एक उत्तम पर्याय ठरू शकते. ही २०१७ मध्ये बनवलेली मारुती सुझुकी एर्टिगा VDI स्मार्ट हायब्रिड मॉडेल आहे. रिझर्व्ह प्राईस सुमारे पाच लाख रुपये ठेवला आहे. यासाठी बँकेच्या वडोदरा शाखेशी (फोन: 0265-2225229 किंवा ई-मेल: sarbar@bankofbaroda.com) संपर्क साधता येईल.

३. गांधीनगर मधील स्टाइलिश हॅचबॅक: मारुती बलेनो

ठिकाण: गांधीनगर

लिलाव तारीख आणि वेळ: २६ सप्टेंबर २०२५, दुपारी २:०० ते संध्याकाळी ६:००

रिझर्व्ह प्राईस: ₹२,७९,०००

ईएमडी: ₹२७,९००

स्टाइल आणि इंधनक्षमतेचा मेळ घेणाऱ्यांसाठी गांधीनगरमध्ये मारुती बलेनो डेल्टा पेट्रोल कार उपलब्ध आहे. या गाडीची किमान किंमत अंदाजे अडीच लाख रुपये ठेवली आहे. लिलावाची अर्ज भरण्याची शेवटची तारीख २५ सप्टेंबर २०२५, संध्याकाळी ५:०० आहे. यासाठी Mr. Surendra Varma (9978446518) यांच्याशी संपर्क साधावा लागेल.

लिलावात सहभागी होताना काय काळजी घ्यावी?

बँकेच्या लिलावात गाडी खरेदी करणे ही एक चांगली संधी असू शकते, पण यासाठी थोडी मेहनत आवश्यक आहे. सर्वप्रथम, लिलावापूर्वी गाडी बघणे अत्यावश्यक आहे. बँका सहसा गाडी तपासणीसाठी एक दिवस निश्चित करतात. गाडीची बाह्य आणि अंतर्गत स्थिती, इंजिनची स्थिती, किलोमीटर याकडे लक्ष द्यावे. दुसरे म्हणजे, लिलावाच्या नियमांना चांगल्या प्रकारे समजून घ्यावे. ईएमडी जमा करणे, अर्ज भरणे यासारख्या औपचारिकता पूर्ण केल्या पाहिजेत. तिसरे आणि सर्वात महत्त्वाचे, आपला बजेट ठरवून ठेवावा. लिलावात उत्साहात जास्त बोली लावून नको. आपल्याला जेवढे पैसे द्यायचे आहेत, तेवढ्यापुरतीच बोली ठेवावी.

बँकेतील लिलाव हा एक गंभीर आणि सुयोग्य मार्ग आहे ज्याद्वारे चांगली गाडी स्वस्तात मिळू शकते. फक्त जरूर ती तयारी केली, तर ही ‘बँकेची ओढून आणलेली कार’ आपल्यासाठी सोन्यासारखी ठरू शकते.

लिस्ट प्रेस नोट
लिस्ट प्रेस नोट  स्त्रोत – https://www.eauctionsindia.org/storage/properties/2025-09-17/BOB17580894062133.jpg

Whatsapp Group Join
Telegram channel Join

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button