नाशिक जिल्ह्यातील या शेतक-यांचा फायदा होणार, वीज कामांसाठी 7 कोटी मिळाले…
नाशिक जिल्ह्यातील या शेतक-यांचा फायदा होणार, वीज कामांसाठी 7 कोटी मिळाले...

नाशिक : नाशिक जिलह्यातील या परीसरातील शेतक-यासांठी आंनदाची बातमी म्हणावी लागेल आता गावांचा वीजेचा प्रश्न सुटणार आहे. प्रामुख्याने शेतकऱ्यांना याचा अधिक फायदा होणार आहे. जिल्ह्यात आता कृषी पंप (Agricultural Pump) वीज धोरण योजनेतून 7 कोटी ( 7 coror ) रुपये खर्चून दोन नवीन विद्युत उपकेंद्र आणि एका उपकेंद्रांच्या क्षमतेत वाढ केली जाणार आहे.
त्यात येवला मतदारसंघातील नगरसूल उपकेंद्रांत 5 एमव्हीएचे अतिरिक्त रोहित्र तर अंगुलगाव व वडगाव बल्हे येथे 33 केव्हीचे नवीन विद्युत उपकेंद्र मंजूर झाले आहे. या तिन्ही विद्युत उपकेंद्रांच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. येवला मतदारसंघातील विजेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या विशेष प्रयत्नांतून विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्यातूनच हे काम मार्गी लागले आहे.
नव्याने मंजूर झालेल्या 33 केव्ही विद्युत उपकेंद्रामध्ये अंगुलगाव येथे 33 के. व्ही. नवीन विद्युत उपकेंद्र कृषी पंप वीज धोरण योजनेमधुन मंजूर झाले आहे. त्यासाठी 3 कोटी 41 लाख खर्च येणार आहे. यासाठी असलेला जागेचा प्रश्न देखील मार्गी लागला असून महावितरणकडे जागा हस्तांतरीत करण्यात आली आहे. या उपकेंद्रांची निविदा प्रक्रिया सुरू झाली असून या कामाला सुरुवात होणार आहे.
येथील शेतकऱ्यांना फायदा कसा ?
वडगाव बल्हे येथे 33 के.व्ही. नवीन विद्युत उपकेंद्र कृषी पंप वीज धोरणमधून मंजूर झाले असून लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कामाला सुरुवात होणार आहे. यासाठी 2 कोटी 17 लाख निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. येवला मतदारसंघातील नगरसूल उपकेंद्रांत झालेली 5 MVA च्या अतिरिक्त रोहित्रांची वाढ तसेच अंगुलगाव व वडगाव बल्हे येथे नवीन उपकेंद्र मंजूर झाल्याने परिसरातील गावांचा वीजेचा प्रश्न सुटणार आहे. प्रामुख्याने शेतकऱ्यांना याचा अधिक फायदा होणार आहे.
येथील वीजप्रश्न सुटणार
नगरसूल सबस्टेशन मध्ये 5 MVA चे अतिरिक्त रोहित्र बसवणे हे काम कृषी पंप वीज धोरणमधून मंजूर झाले आहे. त्यासाठी 1 कोटी 35 लाख खर्च येणार आहे. या कामाचा प्रस्ताव तांत्रिक मान्यतेसाठी पाठविण्यात आला असून लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कामाला सुरुवात होणार आहे. या उपकेंद्रातील अतिरिक्त रोहित्रामुळे चांदगाव, नायगव्हाण, अनकाई या गावांच्या वीजेचा प्रश्न यामुळे सुटणार आहे.